कुरुंदवाड / प्रतिनिधी
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये हजारो भाविक व सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी झाली. श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सकाळी मान्यवर सेवेकऱ्यांच्या हस्ते महानैवेद्य आरती झाली. आरतीनंतर महाप्रसाद वाटप झाले. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, सोलापूर, बेळगाव, गोवा येथून सेवेकरी सहभागी झाले होते.

