श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळा

इचलकरंजी / प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा नदीवेस इचलकरंजी या सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ अखंड नाम, जप, यज्ञ, श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह रविवार २० एप्रिल ते शनिवार २६ एप्रिल २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे.
शनिवारी १९ एप्रिल रोजी ग्रामदेवता मानसन्मान, यज्ञभूमी पूर्वतयारी, २० रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचनास सुरुवात. सोमवार २१ रोजी नित्यस्वाहा: कार, श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, मंगळवार २२ रोजी नित्यस्वाहा: कार, श्री चंडी याग, बुधवार २३ रोजी नित्यस्वाहा: कार, श्री स्वामी याग, गुरुवार २४ रोजी नित्यस्वाहाः कार, श्री गिताई याग, शुक्रवार २५ रोजी नित्यस्वाहाःकार, श्री रुद्र याग, मल्हारी याग, शनिवार २६ रोजी बली पूर्णाहूती, सत्यदत्त पूजन व अखंड नाम जप यज्ञाने सप्ताहाची सांगता होणार आहे, सप्ताह काळात विविध आध्यत्मिक सेवा करण्यात येणार आहेत. सामुदायिक गुरूचरित्र वाचन दररोज पहाटे ६वाजता सुरू होईल, अशी माहिती सेवा केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.

Scroll to Top