दिगंबर जैन समाजातर्फे शोभा यात्रा उत्साहात

इचलकरंजी/ प्रतिनिधी

येथील पद्मप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे सोमवारपासून १००८ सिध्दचक्र विधान पूजा झाली. आचार्य संतशिरोमणी श्री विद्यासागर महाराज यांचे शिष्य विशालसागर महाराज मुनिश्री धवलसागर महाराज, मुनिश्री मंथनसागर महाराज यांच्या आशीवार्दातून रविवारी येथील दिगयबर जैन समाजाच्यावतीने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
या शोभा यात्रेमध्ये शहरातील समस्त दिंगबर जैन समाजातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर रथयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघून या शोभा यात्रेची सांगता खंडेलवाल भवन येथे करण्यात आली. जैन समाजाचे अध्यक्ष ज्ञानचंद पाटणी यांनी आभार मानले.

Scroll to Top