सत्तेच्या वळचणीला बसले असताना देखील आवाडे यांना शहराचे प्रश्न सुटले नाहीत – जयंत पाटील

इचलकरंजीचे आमदार सत्तेच्या वळचणीला बसले असताना देखील त्यांना शहराचे प्रश्न सुटले नाहीत. शहरात अनेक प्रश्न असताना आपल्या संस्थांचे प्रश्न सोडविण्यात इथल्या लोकप्रतिनिधींचा जास्त वेळ जातो, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव न घेता केली.


शहराचा पाणीप्रश्न, उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडविणारा प्रतिनिधी म्हणून चांगला पर्याय देईल. आमचा आमदार झाल्यास मी स्वतः शहरातील समस्यांसाठी ठाण मांडून बसेन, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सुरु असलेली शिवस्वराज्य यात्रा काल इचलकरंजीतल ना. बा. घोरपडे नाट्यगृहात संपन्न झाली .

यात्रेदरम्यान झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवानंद कांबळे, मदन कारंडे, अशोक जांभळे, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, सुनील गवाणे, राजीव आवळे, सुहास जांभळे उपस्थित होते. झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, महागाई व बेरोजगारीमुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळे सरकार लाच म्हणून विविध योजना जाहीर करीत आहे. सरकारचा डाव ओळखून जनतेने जनहिताचे सरकार आणावे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, सत्तेची दिवाळी बघण्यासाठी सरकारने राज्याच्या तिजोरीची होळी केली. अडीच वर्षात

यावेळी भाजपचे माजी जि. प. सदस्य देवानंद कांबळे यांनी कोरोची येथील तीन माजी ग्रा. पं. सदस्यांसोबत शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तसेच कोरवी समाजाचे शहर अध्यक्ष विलास कोरवी यांनीही प्रवेश केला. काही काम केले नाही आणि निवडणूक आल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठका घेत शेवटी शेकडो निर्णय केले. मात्र, परीक्षेपूर्वी गाईड घेऊन कोण पास होत नाही. त्याप्रमाणे निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजनेतून सत्ता मिळत नसते. जिल्हाध्यक्ष आर. के. पवार, पंडित कांबळे, सुनील गवाणे, मेहबूब शेख, आदींची भाषणे झाली. सुहास जांभळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सभेसाठी माजी आमदार अशोक जांभळे, राजीव आवळे, व्ही. बी. पाटील, नितीन कोकणे, आदी उपस्थित होते. मदन कारंडे यांनी आभार मानले.

Scroll to Top