कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर हिवाळी सत्रातील आजअखेर ६७१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांतर्गत शुक्रवारी एम. टेक. च्या दोन अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजित सिंह जाधव यांनी केले आहे.
