“वारणा 2022- 23” वार्षिक नियतकालिकाला शिवाजी विद्यापीठाची पाच पारितोषिक जाहीर

वारणानगर/प्रतिनिधी

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या “वारणा 2022- 23”, वार्षिक नियतकालिकाला शिवाजी विद्यापीठाची पाच पारितोषिक जाहीर झाली आहेत. गेल्या पंचवीस वर्षाहून अखंड पणे पारितोषिके प्राप्त करण्यात महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिक अंकांने या वर्षात ही परंपरा कायम राखली आहे. नियतकालिकाचे मुख्य संपादन आणि प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांनी कामकाज पाहिले. जी-20 परिषद, शिक्षणाचा नवा ध्यास एन ई पी 20-20 या आशयाच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचाही या निमित्ताने गौरव झाला आहे. या यशाबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही. कार्जीनी, प्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांनी संपादक , संपादक मंडळातील सदस्यांचे आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.डॉ. एस.एस. जाधव यांनी संपादित केलेल्या मराठी विभागात ओंकार पाटील यांनी रेखाटलेल्या “बाबा पुन्हा जन्माला या!”या व्यक्तिचित्रणाला, अमित मगदूम यांनी लिहिलेल्या “मी वाघ बोलतोय”, या आत्मकथन पर लेखाला पारितोषिके जाहीर झाली आहेत.
प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर आणि श्री. मोहन सणगर यांनी संपादित केलेल्या हिंदी विभागात प्रज्वल धनवडे यानी लिहिलेल्या “रेत समाधी उपन्यास में चित्रित यथार्थ जीवन”, या संशोधन पर लेखास तर डॉ. प्राजक्ता आहुजा यांनी संपादित केलेल्या इंग्रजी विभागातील सानिका कामते हिने “लिज्जत पापड”, संदर्भात घेतलेल्या मुलाखतीला आणि ज्योती करपे हिने लिहिलेल्या “व्हिजिट टू ताडोबा”, या प्रवास वर्णनाला ही पारितोषिक प्राप्त झाले आहे.
वार्षिक अंकाच्या यशात संपादक मंडळातील सदस्य डॉ. सौ. प्रीती शिंदे- पाटील, प्रा. वर्षा रजपूत, डॉ. एस. जी. जांभळे,एम.एन. पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Scroll to Top