पेठ वडगाव परिसरात श्री डेव्हलपर्सचा शाहू पार्क प्रकल्प

कोल्हापूर / प्रतिनिधी

लँड डेव्हलपिंग व्यवसायातील प्रसिद्ध श्री डेव्हलपर्सचा शाहू पार्क प्रकल्प आता पेठ वडगाव परिसरात साकारला जात आहे. येथे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध असून, बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
श्री डेव्हलपर्सने यापूर्वी अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत. ‘प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार पेठ वडगावमध्ये एक सुरक्षित आणि सुंदर जागा’ या संकल्पनेतून नवीन प्रकल्प होणार आहे. येथे ९८० फुटांपासून ११,००० स्क्वेअर फुटांपर्यंत कलेक्टर एन.ए. प्लॉट उपलब्ध आहेत. पाणी, वीज, डांबरी रस्ते, स्वतंत्र ७/१२ या सर्व सोयीनियुक्त हा प्रकल्प असून, भव्य प्रवेशद्वाराबरोबर गणेश मंदिर, नाना-
नानी पार्क, चिल्ड्रन पार्क, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, स्ट्रीट लाईट आदी सुविधा उपलब्ध आहेत. सर्व प्लॉटची रचना वास्तुशास्त्रानुसार असून ३०, ४०, ५०, ६० फुटांचे प्रशस्त रस्ते आहेत. प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर शाळा, बाजारपेठ, प्रवासी व्यवस्था असून, अधिक माहितीसाठी गट नंबर २, पेठ वडगाव, वाठार पेठ वडगाव रोड येथील साईटशी किंवा उमा टॉकीज जवळील श्री डेव्हलपर्सच्या ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Scroll to Top