इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या कु. लक्ष्मी अरुण सोनुले, कु. ॠतुजा परमेश्वर दुधनी (दोघी गंगामाई) आणि कु. अलहिदा जावेद शेख या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. बालेवाडी (पुणे) येथे ही स्पर्धा १४ जून ते १८ जून कालावधीत होत आहे.
या खेळाडूना प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर ना. बा. एज्यूकेशन संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, सर्व पदाधिकारी तसेच डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, सोनल बाबर व आई-वडीलांचे प्रोत्साहन लाभत आहे. या या निवडीबद्दल खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

