शरद इन्स्टिट्युटच्या आठ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

यड्राव / प्रतिनिधी

यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांची कॉग्नीझंट या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.
कॉम्प्युटर विभागातील मानसी सांगले, काजल सुतार, मृणाली चव्हाण, तुलसी सुंगारे, हर्षदा पवार, वैष्णवी पाटील, वैष्णवी चव्हाण, इलेक्ट्रॉनिक्सच्या श्रेयस पाटील यांची निवड झाली आहे. कॉग्नीझंट कंपनी हि अमेरिकन मल्टीनॅशनल आय.टी. कंपनी आहे. कंपनी बिझिनेस कन्सल्टींग, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी आणि आऊट सोर्सिंग सव्हींसेसचे काम करणारी जगातील अग्रेसर कंपनी आहे. भारतातील मुख्यालय चेन्नई येथे असून एकूण ३.८० लाख तर भारतात १.५ लाख इंजिनिअर्स काम करतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा प्रसून यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Scroll to Top