इचलकरंजी / प्रतिनिधी
मुंबई कोळी समाज संघटनेची शिखर संस्था मुंबई (रजि.) चा मेळावा लोणावळा येथे कोळी द महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आम. रमेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, कोळी महासंघाचे अॅड. चेतन पाटील, पोपट पुजारी, बाबासो शिरगुरे, महादेव कोळी, सुबोध कोळी, बाळासाहेब माने, राजेंद्र नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
सदर मेळाव्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आम. रमेश पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब दत्तू निपाणे यांना कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. सदर कार्यक्रमात कोळी समाजाच्या दाखल्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी व व्हॅलीरिटी संदर्भात येणाऱ्या अडचणी विषयी चर्चा विनिमय झाली. कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून कोळी समाज बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या. अॅड. चेतन पाटील यांनी आभार मानले.

