यड्राव/प्रतिनिधी

यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या ९ विद्यार्थ्यांची पुणे येथील जीई एरोस्पेस कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकलच्या सतिश यादव, विष्णू पासवान, आर्यन राम, यश गलगले, अंजली सुर्यवंशी तर इलेक्ट्रीकलच्या अदित्य रजाक, अभिषेक शिंदे, विजय ढेरे, अजय माने या विद्यार्थ्यांचा सामवेश आहे.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्निकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह
टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे शुभम भरमगोंडा, प्रा. नेहा सोनी, प्रा यांच्यासह, सर्व डिन, विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.
