डीकेटीई एम.बी.ए.च्या २७ विद्यार्थ्यांची डी मार्टमध्ये निवड

इचलकरंजी / प्रतिनिधी

डीकेटीईच्या एम.बी.ए. विभागातर्फे डी मार्ट या कंपनीतर्फे पूल कॅम्पस आयोजिला होता. या कंपनीच्या प्लेसमेंटसाठी पाच महाविद्यालयातील सुमारे १५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. यामध्ये डीकेटीईच्या एमबीए विभागाच्या २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची डिपार्टमेंटल मॅनेजर या पोस्टसाठी निवड झाली आहे.
डि-मार्ट ही भारतातील आघाडीची रिटेल कंपनी असून देशभरात तिची ४०० हून अधिक डिपार्टमेंटल स्टोअर्सची साखळी आहे. डी मार्टतर्फे एच. आर., सर्कल हेड, ऑपरेशन्स यांचे पदाधिकारी यांनी दोन फेऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांचे प्रोत्साहन तर संचालिका प्रा. डॉ.एल. एस. आडमुठे, प्रा.पी.एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर ए.एस. गणपते यांनी परिश्रम घेतले.

Scroll to Top