डिकेटीईतील १३ विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीत निवड

इचलकरंजी / प्रतिनिधी

डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये बी. टेक. इन टेक्स्टाईल्सच्या अंतिम वर्षातील १३ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्युवद्वारे तर तृतीय वर्षातील ६ विद्यार्थ्यांची प्रि-प्लेसमेंटद्वारे वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड लुधियाना (पंजाब) या नामांकीत कंपनीत निवड झाली आहे.
वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड ही देशभरात विख्यात कंपनी असून त्यांचे एकूण २२ हून अधिक उत्पादने आहेत. भारतात गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, भोपाळ अशा विविध राज्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. निवड झालेल्यांमध्ये कमलकिशोर चौधरी, संदेश पिंगट, सुजल कदम, अदित्य कांबळे, आकाश पाटील, रितेश जाधव, प्रमोद शिंदे, रत्नदिप मुधाळे, प्रमोद देशमुख, दर्शन शहाणे, सुरज पाटील, दर्शन शिंदे व अनिकेत अतोळे यांचा समावेश असून हे सर्वजण अंतिम वर्ष टेक्स्टाईलचे शिक्षण संपादन करीत आहेत. तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील श्रृती गुंड, पारस मलमे, सानिका नाईक, चिन्मयी मेळवंकी, सुमिरन पांडे, शंतनू देसाई या ६ विद्यार्थ्यांची विद्यावेतनावर इंटरनशिपसाठी निवड झाली आहे.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी याचे प्रोत्साहन तर इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. अडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस. बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top