इचलकरंजी/ प्रतिनिधी
येथील सर्वोदय विद्या केंद्र – संचलित सर्वोदय विद्यालय व सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून अजितमामा जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अजितमामा जाधव, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. नविता नाईकवडे, सौ. संगीता म्हातुकडे, संस्थापक इस्माईल समडोळे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थापक समडोळे यांनी केले. प्रास्ताविक आस्मा नदाफ यांनी केले. अहवाल वाचन सेक्रेटरी सौ. शबाना समडोळे
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना अजितमामा जाधव, इस्माईल समडोळे व इतर मान्यवर.
यांनी केले. सदर कार्यक्रमात मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे सत्कार करण्यात आले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात स्वागतगीत, भरतनाट्य, देशभक्तीपर गीत, आदिवासी नृत्य यासारखे नावीन्यपूर्ण नृत्यांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमासाठी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
