‘सीआयआय’ दक्षिण महाराष्ट्र अध्यक्षपदी सारंग जाधव; उपाध्यक्षपदी वीरेंद्र पाटील

कोल्हापूर / प्रतिनिधी

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्या (सीआयआय) दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी सारंग जाधव व उपाध्यक्षपदी वीरेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. रेसिडेन्सी क्लबमध्ये झालेल्या वार्षिक सभेत या निवडी झाल्या. यावेळी डिजिटलायझेशन आणि एआयवरील सत्र पार पडले. सीआयआयचे मावळते अध्यक्ष अजय सप्रे अध्यक्षस्थानी होते.
निर्लेप कुकवेअर आणि छत्रपती संभाजीनगरमधील एआयटीजीचे अध्यक्ष राम भोगले व गॅलिडिअन्सचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. अणदूरकर उपस्थित होते.
माजी अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी सीआयआय महाराष्ट्र स्टेट कौन्सिलकडून कोल्हापूरमध्ये कार्यालय सुरू करण्याची तसेच सीआयआयच्या बारा केंद्रांच्या माध्यमातून सीआयआय दक्षिण विभागाला मार्गदर्शन करण्याची मागणी केली.
यावेळी सीआयआयचे महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष विशाल कामत व्हीसीद्वारे उपस्थित होते. सारंग जाधव यांचे नाव अजय सप्रे यांनी सुचवले, तर वीरेंद्र पाटील यांचे नाव सारंग जाधव यांनी सुचवले.
यावेळी सीआयआयचे संचालक रोशन कुमार, स्मॅकचे चेअरमन राजू पाटील, व्हाईस चेअरमन भरत जाधव, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, आयआयएफचे चेअरमन विनय खोबरे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उद्योजक सचिन शिरगावकर, मोहन घाटगे, गिरीश चितळे, मंगेश पाटील, प्रताप पुराणिक, सचिन मेनन, आनंद देशपांडे, सुरेन्द्र जैन, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अमित कुमार गुप्ता, महेश दाते, संजय भगत, कुशल सामाणी आदी उपस्थित होते.
यावेळी मावळते अध्यक्ष अजय सप्रे यांचा स्मृतिचिन्ह देऊन उद्योजक मोहन घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मल्हार भांदुरकर यांनी केले. आभार वीरेंद्र पाटील यांनी मानले.

Scroll to Top