टेनिस स्पर्धेत संदेश, प्रथमेश जोडीला विजेतेपद

कोल्हापूर / प्रतिनिधी

नवी मुंबई येथे झालेल्या एआयटीए राष्ट्रीय चॅम्पियनशिप लॉन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचा खेळाडू संदेश दत्तात्रय कुरळे याने भरघोस यश मिळविले. स्पर्धेत सांगलीच्या प्रथमेश शिंदे याच्या साथीने संदेशने पुरुष दुहेरी खुल्या गटाचे अजिंक्यपद पटकाविले. तर एकेरी प्रकारात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
स्पर्धेतील दुहेरी गटातील अंतिम सामन्यात संदेश व प्रथमेश जोडीने पार्थ देवरुखकर व अर्जुन अभ्यंकर ७-५, ३-६, १०-७ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. एकेरी प्रकारात संदेशला उपांत्य फेरीत आदित्य दुदुपुढी यांच्याकडून ६-२, ४-६, ५ ७ असा पराभव पत्करावा लागला. संदेश कुरळे, अर्शद देसाई टेनिस अॅकॅडमी व मोहिते चॅरिटीचा खेळाडू असून त्याला प्रशिक्षक मनाल देसाईव अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Scroll to Top