छत्रपती शहाजी महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर / प्रतिनिधी

छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती शहाजी म्युझियम ट्रस्ट, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) यासह विविध संस्था-संघटनांची स्थापना करणारे मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शहाजी म्युझियम ट्रस्ट व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण स्मारक आकर्षक फुलांनीसजविण्यात आले होते. ट्रस्टचे चिफ पेटून खासदार शाहू महाराज, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे व माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले. यावेळी सौ. संयोगिताराजे, सौ. मधुरिमाराजे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, उद्योजक तेज घाटगे, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, अर्जुन माने, शारंगधर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंती सोहळ्यास केडीसीएचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, संभाजीराव पाटील मांगुरे, ट्रस्टचे अॅड. राजेंद्र चव्हाणप्रणिल इंगळे, प्रसन्न मोहिते व नागरिक उपस्थित होते. संयोजन राजेंद्र दळवी, मनोज जाधव, सचिन सरनाईक, अमर पाटील, विलास इंजर, धनाजी खोत, राजोपाध्ये बाळासाहेब दादर्णे, अमर जुगर, चोपदार उदय बोंद्रे आदींनी केले.
शहाजी महाविद्यालय कोल्हापूर संस्थानचे शहाजी छत्रपती महाराज यांना ११५ व्या जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील त्यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. पूनम भुयेकर यांचे ‘शहाजी महाराज यांचे जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी डॉ. राजकिरण बिरजे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आईक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वय डॉ. ए. बी. बलुगडे आदी उपस्थित होते.

Scroll to Top