एस.टी.ची अन्यायकारक 15% भाडेवाढ तात्काळ मागे घ्या.. -शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले, त्यास अनुसरून हातकणंगले बस स्थानकसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला. तसेच गोरगरीब व सामान्य जनतेचा प्रवासाचा आधार असलेल्या एस.टी. बसेसची अन्यायकारक केलेली भाववाढ तात्काळ मागे घ्यावी, तसेच प्रवाशांना योग्य त्या सेवा सुविधा पुरवाव्यात अशी मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून हातकणंगले एस.टी. आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हापरिषद सदस्य महेश चव्हाण यांनी देखील आपल्या मनोगतामधून शासनाने केलेली भाववाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा दिला.
महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुवर्णा धनवडे , तालुका प्रमुख उषाताई चौगुले, ग्रा.प सदस्य राधिका पाटील, मा.जि. प. सदस्य महेश चव्हाण, उप तालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, राजेंद्र पाटील, संदीप शेटे, युवासेना उप जिल्हाप्रमुख अनिल माने, तालुकाप्रमुख देवाशिष भोजे, योगेश चव्हाण,वडगाव मा.उप नगराध्यक्ष संदीप पाटील, विजय भोसले, सागर चोपडे, उदय शिंदे, धोंडिराम कोरवी, अमोल देशपांडे,विनायक विभुते, संभाजी हांडे, रघुनाथ नलवडे, संदिप दबडे, केशव पाटील, अंकुश माने, सुनिल माने, अनिकेत माने,शरद पोवार, विश्वास कोळी, हरी पुजारी, रविंद्र पाटील,काका पाटील, श्रीकांत निकम, राजेंद्र कुंभार,पप्पू मुरूमकर, सुरज खोत, तुळशीराम गजरे, दीपक कोळी, संतोष शिंगाडे, अर्जुन जाधव, करण लोंढे, संतोष भोसले, अनिल रोटे, प्रणव लोले, अक्षय लोंढे, अनिकेत पांडव, मंदार गडकरी, अभिजीत शिंदे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top