समृद्धी चव्हाणच्या यशाची ग्रामीण विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी : पाटील

शिरोली/प्रतिनिधी

ग्रामीण भागात राहूनसुद्धा कोणत्याही क्लासला न जाता शिरोली येथील समृद्धी चव्हाण यांनी शासकीय सेवेत यश संपादन केले आहे. याची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन वडगाव बाजार समिती सभापती यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राजपत्रित अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याबद्दल समृद्धी चव्हाण यांचा वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती सुरेशराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक संजय वठारे, उपसभापती जगोंडा पाटील, संचालक विलास खानविलकर, बी. जी. बोराडे, किरणराव इंगवले, सुभाष भापकर, चांद मुजावर, धुळगोंडा डावरे, नितीन कांबळे, वसंतराव खोत, सुनीता चव्हाण आदी उपस्थित होते.

Scroll to Top