सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्काराने ऋतुजा चकोते सन्मानित

जयसिंगपूर/ प्रतिनिधी

हृदयम सोशल वेल्फेअर सोसायटी (पुणे) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्सवाच्या निमित्ताने उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरी नांदणी प्रा. लि.च्या संचालिका ऋतुजा आण्णासाहेब चकोते यांना सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (पुणे) चे उपसचिव डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून हृदयम ग्रुप (बेंगलोर) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जी. व्ही. पी. राव उपस्थित होते. यावेळी हृदयम सोशल वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. संगीता ढमढेरे, सेक्रेटरी मनिषा ठिपके, डॉ. प्रिया पारेख, ऋतुजा जगताप, पुनम अष्टेकर, डॉ. अनुभा पुंडीर, प्रिया साखरे आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील फिरोदिया ऑडिटेरियम, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथे झालेल्या सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात आले. शाल श्रीफळ, शिल्ड व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Scroll to Top