कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी सहज जिल्हा निबंधक नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील सुमारे २४ लाखाहून अधिक कागदपत्रांचे वाचन केले, त्याचे मानधन द्या, अशी मागणी मोडी लिपी जाणकारांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना शुक्रवारी देण्यात आले.
निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या अहवालानुसार कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी विविध शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातही सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत
नऊ मोडी लिपी जाणकारांना जिल्हा प्रशासनाकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार मुद्रांक कार्यालयातील सुमारे २४ लाख कागदपत्रांची तपासणी जाणकारांनी केली. हे काम चार महिने सुरू होते. नोंदी तपासणीचे कामकाज पूर्ण होऊन आठ महिने उलटले तरी त्याकरिता कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात आलेले नाही.
कुणबी नोंदी तपासणीच्या केलेल्या कामाचे मानधन मिळावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी डॉक्टर उदयसिंह राजे यादव, सौ अनघा राजेयादव, प्रतीक्षा पंदारे, करुणा कुराडे, गौतम चक्रवती, महेश यलाजा आदी उपस्थित होते.
