रेशन दुकानदार, सेल्समन यांची कोल्हापुरात कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर/ प्रतिनिधी

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या रेशन दुकानदार व सेल्समन यांना अन्नसुरक्षा व स्वच्छता परीक्षण देण्यासाठी कार्यशाळा लक्ष्मीपुरी येथील खाटीक समाज हॉलमध्ये संपन्न झाली.
केंद्र शासन ८० कोटी जनतेला दरमहा मोफत गहू, तांदूळ रेशन दुकानांमार्फत पुरवठा करते. त्या धान्याची साठवणूक योग्य प्रकारे व्हावी तसेच रेशन दुकानदारांनी साथीच्या आजारामध्ये व आपल्या स्वतःच्या व जनतेच्या आरोग्याची योग्य ते काळजी घेऊन काम करावे असे आवाहन श्रीमती पी.पी. फावडे सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांनी केले रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे व एम आर मासाळ अन्नसुरक्षा अधिकारी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थित केले.
रेशन दुकानदारांना ऋतुजा ढाकणे यांनी चित्रफितीद्वारे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमास दीपक शिराळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य रमेश पाटील, गजानन हवलदार, संदीप लाटकर, अन्वर मोमीन, पांडुरंग सुभेदार, दिनकर पाटील, अव्वल कारकून अक्षय ठोंबरे, एस. के. शनवी, अरुण शिंदे कोल्हापूर शहर, कागल,इचलकरंजी पन्हाळा, हातकणंगले, चंदगड आदी तालुक्यातून २०० वर दुकानदार प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी सर्व सदस्यांना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले.

Scroll to Top