शक्तीपीठ महामार्गाविरोधात १८ रोजी रास्तारोको आंदोलन

सांगली येथील नागपूर-रत्नागिरी हायवेवर शक्तीपीठ महामार्ग विरोधात बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शक्तीपीठ म हामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत देण्यात आला.

नागपूर ते रत्नागिरी हा शक्तीपीठ महामार्ग अनेक कारणांनी वादग्रस्त ठरू लागला आहे. यामध्ये सदर महामार्गातील संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच अनेक विषयांचा समावेश आहे. त्यामुळे या महामार्गाच्याविरोधात सांगली येथे दि. १८ डिसेंबर रोजी नागपूर-रत्नागिरी हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत देण्यात आली. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Scroll to Top