रामराव इंगवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत यश

हातकणंगले/ प्रतिनिधी

येथील हातकणंगले नगरपंचायतमार्फत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रामराव इंगवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये प्रशालेच्या तनिष्क तेजस कांबळे (प्रथम), ईश्वरी संदीप पाटील (द्वितीय), साक्षी जयवंत नागराळे (तृतीय), साईराज मारुती पाटील (उत्तेजनार्थ), तर मोठ्या गटात वेदिका विनोद सुतार (प्रथम), साक्षी तुलसीदास पांडव (द्वितीय), समृद्धी संभाजी कदम (तृतीय), निलेश नंदकुमार खरात व भार्गव धनराज आवळे (उत्तेजनार्थ) यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीकडून सन्मानपत्र व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुनीता पाटील, सुकुमार देवकाते, बी.आर.सी. हातकणंगलेच्या विशेष शिक्षिका रुपाली भोसले, सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन सागर कुंभार यांनी केले.

Scroll to Top