शिरोळमध्ये उद्यापासून राजर्षी शाहू व्याख्यानमाला

जयसिंगपूर / प्रतिनिधी

शिरोळ येथील राजर्षी शाहूनगर वाचन मंदिर या शतकोत्तर ग्रंथालयाच्या वतीने रविवार (दि. २३) ते मंगळवार (दि. २५) अखेर राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
ग्रंथालयासमोरील प्रांगणात सायं. ७ वाजता विविध मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. रविवारी व्याख्यानमालेचा शुभारंभ माजी जि. प. सदस्या इंद्रायणी पाटील यांच्या हस्ते व प्रा. माधुरी माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब माने-गावडे, उपाध्यक्ष एम. एस. माने, कार्यवाह धनाजीराव जाधव, विजयसिंह माने देशमुख यांनी दिली.

Scroll to Top