निपाणी / प्रतिनिधी
निपाणी शहरानजीक असलेल्या तवंदी घाटात ढगफुटी नदृश पाऊस झाल्याने बाहनधारकांची तारांबळ उडाल्याचे चित्र बुधवारी दुपारी पाट परिसरात दिसून आले. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे डोंगर भागातून स्त्यावर येणारे पाणी आणि नवीन तयार झालेल्या उड्डाण पूलावरून पडणारे पाणी यामुळे वाहनधारक गोंधळून गेले.
निपाणी शहर परिसरात गेल्या चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. मात्र आजचा पाऊस हा तवंदी घाट माथ्यावर झाल्याने डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते.
पाणी रस्त्यावरून येत असल्याने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती. तर नवीन तयार करण्यात आलेल्या उड्डाण पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहनांवर पडत होते. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याबरोबरच पाण्यापासून लांब घेऊन वाहने रस्ता पार करावी लागत होती. या भागातील सर्वच परिसरात पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहताना दिसत होते. रस्त्याकडील मोठ्या चरीतून पाणी बाहेर पडून रस्त्यावर येत होते. डोंगर भागातून पाणी येत असल्याने चिखल मातीसह पाणी रस्त्यावरून वाहत होते.

