चित्पावन संघातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर / प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर चित्पावन संघातर्फे हिंदू नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मराठी महिने, तिथी, नक्षत्र, शुभ मुहूर्त, राशिभविष्य आणि धार्मिक स्थळांची माहिती यांचा समावेश असलेल्या या दिनदर्शिकची संकल्पना ‘कला कल्पना’ संस्थेचे संजीव चिपळूणकर यांनी मांडली व सलग तिसऱ्या वर्षी या दिनदर्शिकचे प्रकाशन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात चित्पावन संघाचे ज्येष्ठ संचालक नंदकुमार मराठे यांनी पारंपरिक दिनदर्शिकच्या गरजेवर प्रकाश टाकला. उपाध्यक्ष प्रसाद भिडे यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगितले, तर संजीव चिपळूणकर यांनी ही दिनदर्शिका आर्थिक वर्ष दिनदर्शिकसारखी देखील वापरता येईल, असे स्पष्ट केले. केदार जोशी यांनी आभार मानले.

Scroll to Top