कोल्हापूर / प्रतिनिधी
इव्हेंट मॅनेजमेंट अॅन्ड प्लॅनर्स असोसिएशन (एम्पा) तर्फे आयोजित इव्हेंट इंडस्ट्री क्रिकेट लीग (इआयसीएल) च्या चौथ्या सिझनच्या स्पर्धा नागाळा पार्क येथील स्पोर्टिंगो टर्फवर पार पडल्या. स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रमोटर्स चॅलेंजर संघाने लाईट असोसिएशन वर १२ धावांनी विजेतेपद पटकावले.
साखळी फेरीतून फोटोग्राफर असोसिएशन, लाईट असोसिएशन, प्रमोटर्स चॅलेंजर आणि मंडप असोसिएशन उपांत्य फेरीत पोहोचले. अंतिम सामन्यात वैभवच्या दमदार खेळीमुळे प्रमोटर्सने ४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. याचा पाठलाग करताना लाईट असो. संघ ३० धावांत बाद झाला.
सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी एम्पा क्रिकेट कमिटीचे तुषार पाटील, अवधूत भोसले, राहुल जोशी व शाम बासरानी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास इव्हेंट इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

