कोल्हापूर / प्रतिनिधी
आजच्या काळात ‘डेटा’चे महत्व अतिशय वाढले आहे. डेटा हे नवसंशोधनाचे व प्रगतीचे इंधन आहे. पॉवर बी.आय. तंत्रज्ञान वापरून अचूक विश्लेषणाच्या माध्यमातून जलद व पारदर्शक निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्राध्यापकांनी प्रभावी वापर करावा,असे आवाहन ‘फीस्ट आय.टी. सोल्युशन्स बेंगलोर’चे तज्ञ श्रीनिवास पी. एम. यांनी केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर येथे ‘पॉवर बी. आय’ वरील तांत्रिक कौशल्यां संबंधित राष्ट्रीय ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ मध्ये ते बोलत होते.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम संपन्न झाला. या कार्यशाळेसाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनियरिंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध शाखांमधून सुमारे ७० हुन अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेसाठी ‘फीस्ट आय.टी. सोल्युशन्स बेंगलोर’ मधील शैलेश शेट्टी व श्रीनिवास पी. एम. या तज्ज्ञांनी ‘पॉवर बी.आय. याविषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डॉ. भगतसिंग जितकर, प्रा. राधिका ढणाल, डॉ. सागरगौडा पाटील व सर्व अध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

