कोल्हापूर / प्रतिनिधी
कुंभार मंडप पापाची तिकटी व समस्त कुंभार समाजातर्फे संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कुंभार मंडप येथे सात दिवसांचे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. शनिवारी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री मिरवणुकीचे आयोजन केले होते. उद्घाटन शांताराम माजगावकर, सर्जेराव निगवेकर, उमाजी कातवरे यांच्या हस्ते झाले.
मिरवणूक पापाची तिकटी, गंगावेश, धोत्री गल्ली, ऋणमुक्तेश्वर तालीम, बजाप माजगावकर तालीम, शिवाजी चौक ते कुंभार मंडपात सांगता झाली. यावेळी प्रल्हाद पुरेकर, जगदीश पाडळकर, श्री वाघवेकर, श्रीकांत कातवरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

