वाई / प्रतिनिधी

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील एम एस्सी भाग २ रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु.प्रीती दगडू कोचळे हिच्या शोधनिबंधास राष्ट्रीय परिषदेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.
सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात ‘इमर्जिंग ट्रेंड्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर संपन्न झालेल्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत तिने हे यश संपादन केले आहे. ‘मारिगोल्ड लाईक मायक्रोफ्लॉवर्स ऑफ निकेल कोबाल्ट टंगस्टेट: प्रॉमिसिंग इलेक्ट्रोड मटेरियल फॉर सुपरकॅपॅसिटर’ हा तिचा संशोधनाचा विषय होता. या परिषदेस फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इलेकट्रोनिक्स या विषयांमधून ३०० हून अधिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तिने मिळविलेले यश हे महाविद्यालयासाठी भूषणावह आहे.
तिने सादर केलेल्या शोधनिबंधावर तज्ज्ञ परीक्षकांनी अनेक प्रश्न विचारून तिच्याकडून उत्तरे मिळविली. आपल्या विषयाचे सखोल ज्ञान व संशोधकवृत्ती त्या विद्यार्थ्याला असणे आवश्यक असते हे तिच्या शोधनिबंधांमधून दिसून येते. यापूर्वी तिने विद्यापीठ व राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये उत्तम यश संपादन केले आहे.
प्रीती कोचळे हिच्या विषय निवडीमध्ये शिवाजी विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. (डॉ.) आण्णासाहेब मोहोळकर व डॉ. उमेश शेम्बडे यांचे मोलाचे योगदान आहे. तिला रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, डॉ. संदीप वाटेगावकर, प्रा. दीपाली पाटील यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी ,खजिनदार मा. नारायण चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंत कणसे व प्रा. भीमराव पटकुरे, कार्यालयीन प्रमुख श्री.बाळासाहेब टेमकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.
photo title: प्रीती कोचळे हीचा सत्कार करताना प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, विभागप्रमुख प्रा.(डॉ) ज्ञानदेव झांबरे, प्रा. डॉ. सुनील सावंत, डॉ.संदीप वाटेगावकर, प्रा. दीपाली पाटील, कॅप्टन डॉ समीर पवार, डॉ.शिवाजी ताटे, श्री बी ए टेमकर, श्री किरण शिंदे व आदी मान्यवर
