घरट्यातल्या पिलांना धार जसी |
तसे भाऊ होते आम्हांसाठी ||
कर्तृत्वाने अजरामर झाले |
लौकिक ठेऊन कृष्णाकाठी ||
कड्या कपान्यातून वाहते जसी निर्मळ ती कृष्णामाई।
तसाच हा युगपुरुष राहतो आमच्या मनातल्या ठाई ।।
नतमस्तक होतात माना सावळ्या विठ्ठलाच्या मंदिरी।
स्वाभिमानी होतो कणा भाऊंच्या या निष्ठेच्या राउळी ।।
गर्दीत घेतो लोटांगण पंढरीत विठ्ठलाच्या पायी।
साक्षात पाहिला पांडुरंग जो आज आपल्यात न्हाई ।
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. संत गाडगेबाबा सांगतात देव माणसात हवा दगडात नाही तसंच आम्हाला भाऊ शेवटपर्यंत देव स्वरूपात दिसून आले. भाऊंच्या सामाजिक कार्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांसाठी किसन वीर महाविद्यालयात उभारण्यात आलेले ‘जय किसान मुलांचे वसतिगृह’ जिथे माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना आपली स्वप्नं पुन्हा बघण्याची, भविष्य रेखाटण्याची आणि यशस्वी भरारी घेण्याची संधी भाऊंनी उपलब्ध करून दिली, हे वसतिगृह म्हणजे फक्त एक इमारत नाही तर उद्याच्या असंख्य गरजू विद्यार्थ्यांचं भविष्य आहे. त्यांचं उद्याच आयुष्य उज्वल असावं हा हेतू समोर ठेवून उभारलेली ही इमारत एक मंदिरच.
युगपुरुष आदरणीय भाऊ (प्रतापरावजी भोसले) कधी काळी भारताच्या राजकारणात सक्रिय असणारे भाऊ, किसन वीर आबा, यशवंतराव चव्हाण अशा दिग्गज व्यक्तीमत्वासमवेत त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे भाऊ, सह्याद्रीच्या सानिध्यात कृष्णेच्या छायेखाली सामाजिक बांधिलकी जपणारे भाऊ. किसन वीर महाविद्यालय, खंडाळा महाविद्यालय आणि शिक्षण प्रसारासाठी जनता शिक्षण संस्थेअंतर्गत अनेक छोटे मोठे हायस्कूल चालवणारे भाऊ, इतरांना भाऊ कसे वाटले किया कसे वाटतात हे मला माहीत नाही, आणि ते जाणून घेण्याची माझी इच्छा देखील नाही. कारण मी जाणलेले, मी ओळखलेले, मी पाहिलेले भाऊ माझ्यासाठी देवमाणसा-पेक्षा कमी नाहीत.
आजच्या राजकारण बघता अतिशय वाईट वाटते की आम्ही मराठवाडा, विदर्भ, भाऊंनी या ठिकाणी शिक्षणासाठी आणले आणि स्थानिक राजकारणी लोक साधे बघायला सुद्धा आले नाही. हा भाऊ चांगला मोठेपणा ना जिल्हा ना मतदार संघ तरीसुद्धा भाऊंनी पाचशे सहाशे किलोमीटर अंतरावरून शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचं घर चांगल्या प्रकारे चालन आणि शिक्षणातून त्या विद्यार्थ्यांना चालना मिळेल या उद्देशाने वस्तीगृह उभारलं.
आभाळ होता बाप,
आणि माय होती धरती.
तेव्हा नजर पडली भाऊंची आम्हा पाखरावरती,
कार्य पाहून तुमचे भाऊ देव सुद्धा जळेल,
बदललेले जीवन आमचं उद्या जगाला कळेल,
असेल तर या जगात देव नसेल कुठे गाभाऱ्यात दर्शन मला घडले भाऊ सारख्या मानव रूपात
भाऊंनी आम्हाला परिस्थितीशी झुंज कशी द्यायची हे शिकवलं. भाऊ तुमचे विचार जोपासून पुढे काम करत राहू . तुम्ही दिलेली शिकवण आम्ही नेहमी आदर्श आणि प्रेरणास्थान म्हणून तुमच्याकडे पाहून आमच्या कामाची दिशा ठरते.
काळया मातीत कृष्णेच्या पाण्यावर बहरलेलं हे ‘प्रताप’ नेतृत्व आजीवन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, खेड्या-पाड्यातील विद्याथ्यांसाठी कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता झगडत राहिले. मराठवाड्यातला दुष्काळ असो अथवा कोल्हापूर- कराडातला महापूर असो भाऊ त्यांच्या सामाजिक कार्यापासून कधीही मागे हटले नाहीत. भाऊ लढले, जिजंकले, थकले पुन्हा उभा राहिले पण कधीच थांबले नाहीत, त्यांच्या कार्याशी सदैव प्रामाणिक राहिले. कदाचित भाऊंना आराम हा शब्द माहीतच नसावा, कारण सतत काहीतरी नवीन करण्याची त्यांची धडपड कधी संपलीच नाही, भाऊंच्या कल्पना कची थांबल्याचं नाहीत आणि हीच गोष्ट भाऊ हे सामान्य व्यक्तिमत्व नाहीत याची जाणीव आपल्याला करून देते.
इतर मुलांप्रमाने मी जेमतेम शेती असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील मुलगा, गुणपत्रक ही म्हणावं तसं समाधानकारक नाही, पण खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला सुरुवात झाली ती किसन वीर महाविद्यालयामध्ये असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण इथे माझ्या गुणपत्रकात तर झालाच, पण भाऊ आणि जनता शिक्षण संस्थेतून जो सामाजिक घडा मला मिळाला, तो कदाचित मला कुठेही मिळाला नसता भाऊ नेहमी म्हणायचे तुमचं सामाजिक ज्ञान हे शैक्षणिक ज्ञानापेक्षा जास्त असायला पाहिजे, कारण जिथे शैक्षणिक ज्ञान कमी पडतं तिथं सामाजिक ज्ञान आपल्याला सांभाळून घेतं.
आदरणीय भाऊंच्या विचारांचे वारसदार आदरणीय मदन दादा भोसले यांनी भाऊंनी केलेले वस्तीग्रह सतत पूर्ण चालू ठेवले आणि आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन चांगला उत्तम व्यक्ती बनवण्याची ताकद दादांनी ठेवली आणि मला आपल्याच महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागात अध्यापन करण्याची संधी आदरणीय मदन दादा भोसले यांनी दिली.
भाऊ बद्दल जेवढं बोललं जाईल तेवढं कमीच आहे. कारण सामाजिक कार्याने भारावून गेलेली व्यक्तिमत्वे ही नेहमीच आपल्या समजण्याच्या पलीकडे गेलेली असतात. त्यांचं कार्य त्यांच्यासाठी सर्वस्व होऊन जात भाऊ त्यातील एक आहेत शेवटी एवढच बोलेन.
हनुमानाच्या छातीमध्ये जशी प्रभू रामाची मूर्ती
अमुच्या मनी सदैव दिसते भाऊंचीच किर्ती
शिवरायांच्या पराक्रमाचा गडकोटावर अनुभव घ्यावा
माऊंच्या मायेचा पाझर जयकिसान वसतिगृहात पहावा
असेल जर या जगात देव, तो नसेल कुठे गामान्ऱ्यात,
दर्शन त्याचे घडले मजला, भाऊंसारख्या मानव रूपात.
अखेर काळानं डाव साधला आणि १९ मे २०२४ च्या सूर्योदयाला अखंडपणे तेजस्वी असणारे प्रतापपर्व संपले… भाऊंनी शेवटचा श्वास घेतला. तुम्हा आम्हांला पोरकं करून भाऊंनी अखेरचा निरोप घेतला. पण या जीवन प्रवासात भाऊंनी त्यांचं कार्य देशा साठी अन समाजासाठी अर्पण केले. अशा या लोकनेत्यास व महान अशा व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन…
प्रा. सोमनाथ परमेश्वर सानप
किसन वीर महाविद्यालय,वाई

