जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथे हेरवाड प्रिमियर लीग हाफ स्पिच क्रिकेट स्पर्धेत पॉप्युलर स्पोर्टस् संघ विजेता ठरला. तर रॉयल हिरोज संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर एकता इंडियन्स संघाला तृतीय व रॉयल इंडियन्स संघाला उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले.
साईराज स्पोर्टसच्यावतीने हेरवाड प्रिमियर लीग डे-नाईट क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कुमार विद्यामंदिर समोर असणाऱ्या क्रिडांगणावर या स्पर्धा घेण्यात आल्या. अंतिम सामन्यात पॉप्युलर स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकात ४० धावसंख्या उभारली. प्रत्युत्तर रॉयल हिरोज संघ ३० धावाच करु शकला. त्यामुळे दहा धावांनी पॉप्युलर संघ विजयी ठरला.
तर एकता इंडियन्स संघ तृतीय व रॉयल इंडियन्स संघाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. अंतिम सामन्यात सामनावीर जितेंद्र मधाळे, मालिकावीर कार्तिक गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज दादा कुन्नुरे, उत्कृष्ट फलंदाज क्रांतीवीर पाटील यांचा सन्मान झाला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी सरपंच रेखा जाधव, वर्षा पवार, संजय पुजारी, ऋतुराज तराळ, अमर शिरढोणे, अमोल कांबळे, विकास माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

