जनवाड येथे प्लास्टिक घनकचरा उपक्रम

बोरगाव/ प्रतिनिधी

जनवाड येथे श्री महादेव स्वामी मठाच्या यात्रेनंतर मंदिर व परिसरात साचलेल्या घनकचरा प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता कामाचा उपक्रम विज्ञान शिक्षक संतोष पाटील यांच्यासह अन्य सहकारी शिक्षकांच्या पुढाकाराने शिरदवाड सरकारी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने राबविण्यात आला.
निसर्गाचा समतोल राखण्याबरोबरच पर्यावरणात प्लॉस्टिकमुळे होणारी कॅन्सर सारखी रोगराई नष्ट व्हावी त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण श्री व्यंकटेश्वरा शुगर कारखाना व एमडी स्वरूप महाडिक, पर्यावरण समतोल विभागाचे रामदास पाटील, महादेव स्वामी धर्मरमठ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या घनकचरा निर्मूलन शिबिरामध्ये यात्रा व परिसरात विखुरलेला प्लास्टिक कचरा गोळा करून तो साठा करत व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या पर्यावरण समतोल अधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्यात आला.
यावेळी शिक्षक सुभाष पाटील, डॉ. आप्पासाहेब घाटगे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक टी.टी नाडकर्णी, संतोष पाटील, सुभाष पाटील, अनुपमा मडीवाळ, अध्यक्ष अनिल पुजारी, नंदकुमार जांगडे, रामा कुडचे उपस्थित होते.

Scroll to Top