पोदार स्कूलमध्ये उद्या प्लॅनेटरी परेड कार्यक्रम

कोल्हापूर / प्रतिनिधी


पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर, विद्यार्थ्यांसाठी एक रोमांचक खगोलशास्त्रीय कार्यक्रम ८ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करत आहे. ‘प्लॅनेटरी परेड’ या विशेष आकाश निरीक्षण कार्यक्रमात, आयुका पुणे (IUCAA Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) च्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्रहांच्या विस्मयकारक मांडणीचे निरीक्षण केले जाईल.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रहांची कक्षीय हालचाल आणि खगोलशास्त्राच्या तत्त्वांबद्दल समजून घेण्याची संधी देईल. यामध्ये विद्यार्थ्यांना एक पालक किंवा मित्र सोबत आणण्याची संधी आहे. कार्यक्रम चार बॅचेसमध्ये होणार असून रात्री १०:३० वाजताची बॅच सर्वांसाठी खुली असेल. ज्यांना आपल्या मुलांसह या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी पोदार इंटरनॅशनल स्कुलशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Scroll to Top