कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करीत आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील नवीन वाशी नाका चौका जवळील रहिवाशी बळवंत रामचंद्र पोवार यांनी उघड्यावर कचरा टाकल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना पाचशे रुपयांचा दंड केला आहे. आता आपण काय करणार ही व्यक्ती वाशी नाका परिसरामध्ये उघड्यावर कचरा टाकताना आरोग्य निरिक्षकासह कर्मचाऱ्यांना आढळून आले. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीस कचरा टाकलेबद्दल दंडात्मक कारवाई करणार असलेचे सांगितले. यावेळी बळवंत पोवार यांनी महापालिकेच्या आरोग्य निरिक्षक व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरली. सदरची माहिती आरोग्य निरिक्षकांने सहा. आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील यांच्या दुरध्वनीवरुन कळविली. यानंतर सहा. आयुक्त कृष्णा पाटील यांनी सदरचे व्यक्तीवर फौजदारी दाखल करण्याच्या सूचना आरोग्य निरिक्षकांना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हा नोंद करावयास गेलेवर पोलिसांनी एक वेळ त्यांना समज देऊन महापालिका प्रशासनाची माफी मागायला लावू, असे सांगितले. त्याप्रमाणे बळवंत रामचंद्र पोवार यांना समज देऊन माफी मागायला लावून रु.५००/-दंड भरावयास लावला.

