पट्ट‌णकोडोलीव उद्या तुळजाभवानी उत्सव

पट्टणकोडोली/प्रतिनिधी

श्री क्षेत्र पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील सकल मराठा समाज व ग्रामस्थ यांच्यावतीने मंगळवार ता. ६ मे रोजी श्री तुळजाभवानी मातेचा वार्षिक पालखी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५.३० वाजता दिलीप बाणदार दाम्पत्यांच्या हस्ते तुळजाभवानी मूर्तीस अभिषेक घालण्यात येणार आहे. सकाळी ७.१५ वाजता प्रभारी सरपंच अमोल बाणदार दापत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता गुंडा सुर्यवंशी भजनी मंडळाची भजन सेवा होणार आहे. ७.१५ वाजता महाआरती, पालखी सोहळा व मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी खास. धैर्यशील माने, आम. डॉ. अशोकराव माने, आम. डॉ. राहुल आवाडे, आम. अमल महाडिक, श्री शाहू विकास सेवा संस्थेचे चेअरमन प्रकाश जाधव, बाळासो कागले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी ग्रामस्थांनी या पारमार्थिक कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Scroll to Top