शिरढोण येथे २ मार्चपासून पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव

शिरढोण / प्रतिनिधी

येथे जैन धर्मियांचे श्रद्धास्थान श्री १००८ भगवान आदिनाथ दिगंबर यांचा ऐतिहासिक पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव रविवार, दि. २ ते शनिवार, दि. ८ मार्चअखेर होणार आहे, याची माहिती श्री १००८ भ. आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली. या महोत्सवासाठी आचार्य श्री १०८ धर्मसेनमुनी महाराज, आचार्य श्री १०८ जिनसेन मुनी महाराज, आचार्य श्री १०८ धर्मभूषण मुनी महाराज, गणनी आर्यिका १०५, जिनदेवीमाताजी यांच्यासह संघ सानिध्यात संपन्न होणार आहे.
महोत्सवासाठी नेटके नियोजन करत असल्याची माहिती अध्यक्ष कल्लाप्पा कोईक, उपाध्यक्ष रावसो यमकनमर्डे व सर्व ट्रस्टी यांनी दिली.
श्री मद्देवाधिदेव १००८ भ. पार्श्वनाथ तीर्थंकर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा, शिखरस्त श्री १००८ भ. पुष्पदंत तीर्थंकर प्रतिष्ठा द्वादश वर्ष, मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब प्रतिष्ठा त्रिद्वादश वर्ष, महामहोत्सव तथा श्री पद्मावती मातेची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच विश्वशांती महायाग होणार आहे.
यावेळी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी नांदणी मठ, स्वस्तश्री लक्ष्मीसेन महास्वामीजी कोल्हापूर मठ, डॉ. स्वस्तिश्री देवेंद्रकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, होम्बुज मठ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Scroll to Top