दानोळी / प्रतिनिधी
येथील श्री १००८ भगवान चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिरमधील वेदीशुद्धी, वेदीप्रतिष्ठा व जिनबिंब विधी मूलनायक भगवान व शिखरस्थ भगवान प्रतिमा स्थापन विधी सोमवार (दि. २८) ते बुधवार (३०) या दरम्यान होणार आहे. यावेळी प. पू. श्री १०८ अविचलसागर महाराज व नेमीसागर महाराज यांचे पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सोमवारी सकाळी मंगलवाद्य घोष, यजमान, इंद्र-इंद्राणी, अष्टकुमारीका यांचे आगमन, मुनिश्रींना निमंत्रणासह विविध धार्मिक विधी आणि पंचकल्याणक विधान सुरू होईल. मंगळवारी नित्यविधी याग मंडल विधान, वेदी प्रतिष्ठा, मुनिश्रींचे प्रवचन, सवाल, विश्वशांती जाप्य, आरती, व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. बुधुवारी नित्यविधी, प्रतिमा मंदिरामध्ये चल करणे, शिखर कलश, ध्वजपूजन व कलश, ध्वज स्थापन विधी होईल. त्यानंतर मूलनायक तीर्थंकर स्थापना, शिखरस्थ आदिनाथ तीर्थंकर व मानस्तंभातील चतुर्मुख प्रतिमा स्थापना करण्यात येतील. सायंकाळी रथोत्सोव मिरवणूक निघेल. या विधानाचे प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्ये व स्थानिक पंडित आहेत.

