चैत्र यात्रेच्या अनुषंगाने जोतिबा मंदिरात सोमवारी पाकाळणी सोहळा पार पडला. त्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ केला. देवदेवतांच्या साहित्यांचीही स्वच्छता केली.
जोतिबा डोंगर येथील पुजारी, देवस्थान समितीचे कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्व मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ केला. सोमवारी सकाळपासून मंदिर परिसर व शिखरे स्वच्छ करण्यात आली. त्यासाठी मंदिरातील वीजप्रवाह सोमवारी खंडित केला होता. देवदेवतांच्या साहित्यांचीही स्वच्छता करण्यात आली. चैत्र यात्रा काही दिवसांवर आल्याने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. यावेळी दहा गावकर प्रतिनिधी, देवस्थान समितीचे इन्चार्ज धैर्यशील तिवले, पुजारी, ग्रामस्थ, समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

