कबनूरच्या कुस्ती मैदानाचा पै. भोंदू मानकरी

कबनूर / प्रतिनिधी

येथील जंदीसाहेब व ब्रॉनसाहेब ऊरूस समितीकडून घेण्यात आलेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी महान भारत केसरी पै. विशाल भोंदू याने महाराष्ट्र केसरी पै. बाला शेख याला फ्रन्ट सालतो या डावावर आस्मान दाखवले तर महिला पै. राष्ट्रीय पदक विजेती गौरी पाटील हिने पै. हिमानी हरियाणा हिला मोळी डावावर आस्मान दाखवले.
येथील कोल्हापूर रस्ता ओढ्याजवळील घेतलेल्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील, उपसरपंच सुधीर लिगाडे, संचालक पंचगंगा सहकारी साखर कारखाना प्रमोद पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले, बी. डी. पाटील, मधुकर मणेरे व मान्यवर आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. पहिल्या क्रमांकाचे विजेते पै. भोंदु यांना माजी सरपंच कै. इरगोंडा म्हादगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ यशवंत पुरस्कार मा. सरपंच सुधीर पाटील यांच्याकडून चांदीची गदा भेट करण्यात आली तर प्रथम क्रमांक महिला पैलवान गौरी पाटील यांना कै. वस्ताद देवगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ यशवंत पुरस्कर मा. सरपंच सुधीर पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली. महिलांच्या झालेल्या सहा कुस्तीत क्रमांक दोनची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेती पै. अंकिता फातले हिने राष्ट्रीय पदक विजेती पै. वेदिका जाधव हिला पराभूत केले तर क्रमांक तीनची कुस्ती पैलवान जागृती पाटील हिने पैलवान श्रावणी लोखंडे हिला एकेरीकस डावावर आसमान दाखवले.
पुरुष पैलवान कुस्तीमध्ये क्रमांक दोनची कुस्ती पैलवान जमदाडे याला मैदानात दुखापत झाल्याने बरोबरीत सोडविण्यात आली तर क्रमांक तीन ची कुस्ती मुंबई मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मदने याने पैलवान योगेश पवार याला दुहेरी डावावर आसमान दाखवले. या मैदानात सुमारे महिला व पुरुष पैलवानांच्या सुमारे ९० निकाली कुस्त्या घेण्यात आल्या. दरम्यान या मैदानास माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, प्रकाश आवाडे, पोलीस अधिकारी रणवीर जाधव, उदय पोतदार यांनी भेट दिली. हजारो कुस्तीप्रेमी प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या कुस्ती मैदानात ऊरूस समितीने योग्य नियोजन केले होते.
कुस्ती मैदानाचे निवेदक सांगलीचे ज्योतीराम वाझे यांनी केले. यावेळी संचालक बबन केटकाळे, सदस्य समीर जमादार, मधुकर मणेरे, भैया जाधव, शंकर सुतार, सुनील स्वामी, किशोर पाटील, महेश कांबळे, सुनील इंगवले, शिवाजी कोतवाल, शिवगोंडा पाटील, अल्ताफ मुजावर, सचिन सुतार, महावीर लिगाडे, बाबासो कोकणे, महावीर पिंपळे, शंकर पोवार, सुधाकर महाडिक, धुळगोंडा पाटील, बाळासो कदम, पापालाल सनदी सह ऊरस समितीचे पदाधिकारी हजर होते
कुस्ती मैदानात पंच म्हणूने पै. निंबाळकर, संजय सुतार, नंदू भोसले, अंकुश फसारे, तुकाराम पाटील, किसन वाघमोडे, बाळू माने, शिवाजी माने, अवधूत माने, सुनील पाटील, दीपक खरात, दीपक सासणे, बाळू पाटील, साहेबराव, सरदार मुल्लानी यांनी काम पाहिले. आभार सुधीर पाटील यांनी मानले.

Scroll to Top