पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव चषक क्रिकेट स्पर्धा 23 डिसेंबरपासून

 

कोल्हापूर : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या क्रीडानगरी कोल्हापुरातील नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन आणि त्यांना एमपीएल, आयपीएलसारख्या देशपातळीवरील स्पर्धात खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने परिवहन कल्चर व स्पोर्टस् फाऊंडेशन संलग्न शांद फाऊंडेशनतर्फे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर टी-20 क्रिकेट लीग स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. 23 ते 29 डिसेंबर या कालावधीत शास्त्रीनगर व शाहूपुरी जिमखाना मैदानांवर स्पर्धेतील सामने रंगणार आहेत. यापूर्वी फाऊंडेशनतर्फे छत्रपती शाहू महाराज चषक व आमदार चंद्रकांत जाधव चषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या धर्तीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. कोल्हापूर : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या क्रीडानगरी कोल्हापुरातील नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन आणि त्यांना एमपीएल, आयपीएलसारख्या देशपातळीवरील स्पर्धात खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने परिवहन कल्चर व स्पोर्टस् फाऊंडेशन संलग्न शांद फाऊंडेशनतर्फे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर टी-20 क्रिकेट लीग स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. 23 ते 29 डिसेंबर या कालावधीत शास्त्रीनगर व शाहूपुरी जिमखाना मैदानांवर स्पर्धेतील सामने रंगणार आहेत. यापूर्वी फाऊंडेशनतर्फे छत्रपती शाहू महाराज चषक व आमदार चंद्रकांत जाधव चषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या धर्तीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्य आणि बक्षिसांचा वर्षाव…
प्रत्येक संघातील खेळाडूंना टी-शर्ट व कॅप देण्यात येईल. स्पर्धेसाठी व्हाईट बॉलचा (पांढरा चेंडू) वापर होईल,
विजेता संघ : 50 हजार व चषक / उपविजेता संघ: 30 हजार व चषक, मालिकावीरास 5 हजार रुपये.
सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजास प्रत्येकी 5 हजार रुपये / प्रत्येक सामन्यातील सामनावीरास 1 हजार रुपये.
फ्रेंचाईजी : लोटस, अमरबागी स्पोर्टस्, शिवनेरी स्पोर्टस्, माई सनराईज, एच. एम. फाईटर्स, एस एस कम्युनिकेशन, सरस्वी इलेव्हन, यश टायगर्स.

आयकॉन प्लेयर : रणजित निकम, वैभव पाटील, क्षितीज पाटील, महेश मस्के, असीम मुजावर, रोहित पाटील, शुभम माने, ओंकार मोहिते.

Scroll to Top