खोची येथे मधमाश्यांंनी केलेल्या हल्ल्यात तीसहून अधिक जखमी

येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात 30 हून अधिक जण जखमी झाले. यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींवर खासगी तसेच सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मंदिर परिसरात मधमाश्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्याने यात्रेत धावपळ झाली.

खोची येथील जाधव, घोडके गल्लीतील ग्रामस्थ यात्रेनिमित्त नैवेद्य घेऊन मंदिराकडे गेले होते. महिला आणि लहान बालके सोबत होती. नैवेद्य अर्पण करण्यासाठी चिंचेच्या झाडाखाली बसले होते. याचवेळी अचानक मधमाश्यांचे पोळे झाडावरून खाली पडले. खाली पडलेल्या मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. मधमाश्यांच्या हल्ल्यात रणजित घोडके, योगेश जाधव, कुमार जाधव, सचिन जाधव, गणपती जाधव, रोहन जाधव, हर्षवर्धन घोडके आदींसह महिला, लहान मुलांचा जखमीमध्ये समावेश आहे. अचानक हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थ सैरावैरा धावू लागले. त्यामुळे थोडा वेळ यात्रेत गोंधळ झाला. प्रकृती स्थिर झाल्याने सर्व जखमींना घरी पाठवण्यात आले आहे.

Scroll to Top