इचलकरंजीत दोनदिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन

इचलकरंजी/ प्रतिनिधी

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने इचलकरंजी येथे ६ व ७ फेब्रुवारीला दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव होत आहे. राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित असतील. साहित्यिक कृष्णात खोत हे प्रमुख पाहुणे असतील. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शालिनी इंगोले उपस्थित असतील.
ग्रंथोत्सवात ६ फेब्रुवारी ला सकाळी ८:३० : ग्रंथदिंडी निघेल दुपारी अडीच : साहित्यिक डॉ. हिमांशु स्मार्त यांचे ‘मराठी भाषेचा अभिजात दर्जा व पुढे’ यावर व्याख्यान होईल. दुपारी साडेतीन : विसुभाऊ बापट, कुटुंब रंगलय काव्यात हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ‘मला भावलेले पुस्तक’ यावर विद्यार्थ्यांचे मनोगत, दुपारी १२ वाजता डिजिटल युगातील वाचनसंस्कृती व ग्रंथालयांची भूमिका यावर व्याख्यान, दुपारी अडीच वाजता प्रा. डॉ. रफिक सुरज यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. दुपारी चार वाजता ग्रंथोत्सव समारोप होणार आहे.

Scroll to Top