यड्राव / प्रतिनिधी
येथील शरद इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ता. ४ व शनिवार ता.५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते होणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करता येणार आहेत. तरी जास्तीतजास्त वाचक रसिक, विद्यार्थी व सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन शरद इंजिनिअरिंगचे ग्रंथपाल युवराज पाटील यांनी केले आहे.

