कसबा बावडा / प्रतिनिधी
सुवर्ण महोत्सवी विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्या वतीने ५५ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त दि. २८ एप्रिल ते दि. २ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहित सालपे यांनी दिली.
दि. २८ एप्रिल रोजी पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे माळ गल्ली येथे सर्व निमंत्रितांच्या उपस्थितीत मिरवणुकीने आगमन होईल. सायं. ठीक ६.३० वाजता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन व अभिषेक माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, दौलत देसाई व विनायक कारंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नगरसेवक मोहन सालपे आहेत.
देवा. १० मिनिटांनी शिवजन्मकाळ दि. २९ एप्रिल रोजी सकाळी १० सोहळा मधुरिमाराजे छत्रपती, सौ. पूजा पाटील व सौ. वृषाली पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायं. ६ वा. शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दि. ३० एप्रिल रोजी सायं. ४.०० वा. महिलांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायं ७.०० वा. शिवव्याखाते सुदर्शन शिंदे यांचे ‘जाणीव शंभुराजेंच्या बलिदानाची’ या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. गुरुवार, दि. १ मे रोजी सकाळी १० वा. इयत्ता चौथी ते सातवी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. दुपारी ३ वा. मोटारसायकल बरोबर रेडकू पळविणे व मोटारसायकल बरोबर म्हैस पळविणे तसेच सायं. ४ वा. १२ वर्षांखालील लहान गटातील पळण्याची शर्यत व सायं. ७ वा. जेन्टस् व लेडीज संगीत खुर्ची या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २ मे रोजी सायं. ६ वा. शालेय इयत्ता ४ थी ते ७ वी या गटातील मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि रात्री ८ वा. ‘सामाजिक प्रबोधन’ या विषयावर खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धा आणि रात्री ९ वा. हिप्नॉटिझम कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाने ५५ व्या शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे.

