हातकणंगले / प्रतिनिधी
आळते (ता. हातकणंगले) येथील श्री क्षेत्र कुंथूगिरी येथे गणाधिपती गणधराचार्य श्री. १०८ कुंथूसागर महाराज यांचा ७९ वा वाढदिवस व ६० वा दीक्षा महोत्सव ता.१३ जून ते १५ जूनपर्यंत विविध – धार्मिक कार्यक्रम व उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन श्री. गणाधिपती गणधराचार्य कुंथूसागर विद्या शोध संस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
ता. १३जून रोजी सकाळी ७ वाजता ध्वजारोहण, ८.३० वाजता पंचामृताभिषेक, ९ वाजता आहारचर्या, दुपारी १ वाजता महामृत्युंजय विधान, सायंकाळी ७ वाजता आरती व गुरुभक्ती होणार आहे. तर ता.१४ जून रोजी सकाळी पंचामृताभिषेक, आहारचर्यासह दुपारी १ वाजता पद्मावती पूजा व सायंकाळी ७ वाजता आरती गुरुभक्ती होणार असून तारीख १५ रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार असून पहाटे ५ वाजता मंगलवाद्य सकाळी ६.३० वाजता जुलूस, ७.३० वाजता गुरुपूजन, ९.३० वाजता आहारचर्या, १० वाजता विशेष महामस्तकाभिषेक पुन्हा दुपारी २ वाजता जुलूस, दुपारी २.३० वाजता भगवान बाहुबली वेदी शिलान्यास समारोह व ३ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमासह श्री गणाधिपती गणधराचार्य कुंथूसागर महाराज यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तीन दिवस संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास देशातील नामवंत उद्योगपतीसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच नव्याने बांधलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन होणार आहे.

