केआयटीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील पायोनियर स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

येथील के आयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने पायोनियर ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा येत्या २२ व २३ फेब्रुवारी रोजी केआयटी कॉलेजच्या प्रांगणात संपत्र होणार आहे. दिल्ली, बिहार, कर्नाटक, गोवा तसेच अन्य वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या इंजिनिअरिंग, डिप्लोमा महाविद्यालयातील विद्याध्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केल्याची माहिती के आपटी कॉलेजचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षीच्या सर्व स्पर्धामध्ये मिळून सुमारे ५ विजेोत्थाना वितरित केली जाणार असल्याचे संचालकांनी सांगितले. यावर्षी होणाऱ्या २८ व्या पायोनियरचे उद्‌घाटन बरिष्ठ एचआर शिल्पा महाजनी यांच्या हस्ते होणार असून कौस्तुभ ठाणावाला व मुस्कान चितलाजिया हे अतिधी म्हणून तर पारितोषिक वितरणासाठी निखिल कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या ‘पायोनियर-२५ को निमंत्रक प्रा. प्रमोद जाधव यांनी मध्यवर्ती स्पर्धा अभिव्यक्ती’ व ‘प्रकल्प बात संक्षिम माहिती पत्रकारांना दिली. या मध्यवर्ती स्पर्धेमध्ये जवळपास ५०० विद्यार्थी सहभागी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रा. अश्विनी शिंदे यांनी ९ विविध द्विपार्टमेंटच्या होणाऱ्या तांत्रिक स्पर्धाची माहिती उपस्थितांना दिली. ज्या त्या विभागानुसार होणाऱ्या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुमारे २८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जितेंद्र भाट यांनी आभार मानले. शिवांजली पाटील यांनी स्वागत केले. पत्रकार परिषदेवेळी प्रा. अमित वेद्य, ओमदर्शन शिदे पाटील, गिरीश देसाई, अमन कुरेशी, व्रता तेली उपस्थित होते.

Scroll to Top