आळते / प्रतिनिधी
आळते (ता. हातकणंगले) येथे दोन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . दोन दिवस चालणाऱ्या किर्तन महोत्सवात श्री गुरुमाऊली ह. भ. प भगवती महाराज सातारकर व श्री गुरु ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांच्या अमृत वाणीतून टाळ मृदंगाच्या गजरात किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम शिवतेज शाळेच्या पटांगणात शनिवार दि. ७ डिसेंबर ते ८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे. तरी सर्व हरि भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक संजय उर्फ मुरलीधर दिक्षीत व सौ. मयुरी दिक्षीत यांनी केले आहे