अभ्यासामध्ये सातत्य ठेवत कष्ट घेतले पाहिजे : डॉ. वसुंधरा घोडके

हातकणंगले /प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वैज्ञानिक व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवत कष्ट घेतले पाहिजेत. यशाला शॉर्टकट नाही. आई -वडील सांगतात ते विद्यार्थ्यांनी ऐकलं तरच निश्चितपणाने चांगले भविष्य घडेल . असे प्रतिपादन दंततज्ज्ञ डॉ . वसुंधरा घोडके यांनी केले. हातकणंगले येथील श्री. रामराव इंगवले हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यध्यस्थानी मुख्याध्यापिका सुनीता पाटील होत्या.कार्यक्रमाची सुरुवात सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
दरम्यान, माजी विद्यार्थी रोहित मोरे याची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्या बद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची लावणी ,नाट्यछटा सादर केल्या. स्मरणशक्ती , रेणूसूत्र पाठांतर व वैज्ञानिक कोडी यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभाग प्रमुख प्रतिभा उमाजे , पर्यवेक्षक पोपटराव वाकसे, हारुण महात उपस्थित होते. वैशाली कुरणे, रोहित पाटील, पूनम शेख, तृप्ती सुतार , सागर कुंभार यांचे सहकार्य लाभले. यावेळी सूत्रसंचालन साक्षी पांडव व श्रेया चव्हाण यांनी तर आभार अस्मिता जगदाळे यांनी मानले.

फोटो ओळी :
हातकणंगले -येथील रामराव इंगवले हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ वसुंधरा घोडके .

Scroll to Top